लोणीकंद मध्ये प्लॉटिंगचा भांडाफोड...! कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवून अवैध प्लॉटिंग व्यवसाय लोणीकंदमध्ये जोमात

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
                 पुणे शहरालगत हवेली तालुक्याच्या पूर्वपट्यात पुणे नगर महामार्ग लगत अवैध स्वरूपाचे प्लॉटिंग व्यवसाय जोरात चालू असून यामधून महसूल खात्याच्या डोळ्यांमध्ये अक्षरशः माती टाकून कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवत राजरोसपणे प्लॉटिंग व्यवसायिक अवैधरित्या मनमानी कारभार करत शासनाची व प्लॉट खरेदीदारांची फसवणूक करीत असल्याचा प्रकार लोणीकंद मध्ये उघड झाला आहे, 
                   याबाबत लोणीकंद मधील ग्रामपंचायतचे माजी सरपंच सागर तुकाराम गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कुळ कायदा/महसूल शाखा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याकडे तक्रार केली असून या सदर्भात चौकशीसाठी मंडलाधिकारी लोणीकंद यांच्याकडे जबाब ही नोंदवण्यात आले आहेत, 
                वास्तविकता भोगवटा क्रमांक 2, असा जुना सातबारा असणाऱ्या महार वतनाच्या कुळ कायद्यामधील जमिनी अक्षरशः भोगवटा क्रमांक 1, मध्ये परिवर्तन करून या जमिनीवर प्लॉटिंग व्यवसायिकांनी प्लॉटिंग व्यवसाय थाटला आहे, महार वतनाच्या जमिनी शेरा बदलण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी नंतर जमिनीच्या किमतीच्या 50% रक्कम नजराण म्हणून शासन दरबारी भरावी लागत असताना, हा महसूल बुडवून जुन्या फेरफराची महार वतन असल्याची माहिती असताना देखील संबंधित प्लॉटिंग व्यावसायिक शासनाच्या तसेच प्लॉट खरेदाराची राजरोसपणे फसवणूक करत असल्याचा प्रकार लोणीकंद मध्ये उघड झाला असून लोकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे, 
                   या संदर्भात रीतसर तक्रार दाखल असल्याने महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने यावर कारवाई करून भोगवटा मध्ये झालेला बदल यामुळे शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झालेली असून संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करून शासनाची झालेली फसवणूक भरून काढावी अशी ग्रामस्थ तसेच तक्रारदार वारंवार विनंती करत आहेत,
                 लोणीकंद येथील एका नामांकित वस्ती मध्ये पूर्वीचा भोगवटा 2 महार वतन असणाऱ्या जमिनीत प्लॉटिंग मध्ये बांधण्यात आलेल्या सुमारे 100 च्या वर घरांना संबंधित कारवाईचा फटका बसणार आहे, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये असून लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!