जागतिक योगा' दिनाचे औचित्य साधून महिला व बाल कल्याण, महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास, विविध सामाजिक विषयावर व विधायक कार्यात अग्रेसर असणाऱ्या माहेर संस्थेच्या कोरेगाव भिमा येथील ट्रैनिंग सेंटरच्या वतीने योगा दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कोरेगाव भिमा पंचक्रोशीतील महिला स्वयं सहायता बचत गटातील महिला, मुली, ब्युटी पार्लर क्लासाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
सामूहिक योगा घेण्यात आला. सोबत योगाचे महत्व विविध असनातून व विविध प्रकारांचे प्रात्यक्षिक मोनादीदी यांनी दाखवले व सर्वांना शुभेच्छा दिल्या .यावेळी व्यवस्थित योगा- आसन करणाऱ्या सहभागींना भेट वस्तू देण्यात आली.सदर कार्यक्रमाचे नियोजन माहेर तंत्रज्ञान प्रकल्प प्रमुख तेजस्विनी पवार मॅडम यांनी केले व उपस्थित महिला भगिनींनचे आभारही पवार मॅडम यांनी मानले.