पुणे जिल्हा प्रतिनिधि
इंदापूर तालुक्यातील बळीराजाचे प्रलंबीत प्रश्न सुटले नाही तर अमरण उपोषण करणार असा भगवानराव खारतोडे यांचा प्रशासनाला इशारा याचं वेळोवेळी भरारी न्यूजने वृत्तांकन करून शासनापर्यंत पोहचवण्याचे काम केले होते त्यामुळे भरारी न्यूजचे आभार सामाजिक कार्यकर्ता भगवानराव खारतोडे तसेच बळीराजाने मानले आहेत.
१४ जून रोजी तलाठी कार्यालय निरगुडे ता. इंदापूर जि. पुणे येथे आमरण उपोषणाला सामाजिक कार्यकर्ता भगवान बापू खारतोडे बसणार आहेत हे प्रशासनास समजताच आपल्या विभागांसंदर्भात जे विषय प्रलंबीत आहेत ते मार्गी लावण्याचे काम प्रशासनाने चालू केले आहे परंतु खालील विषय जर सोडवले नाही तर अमरण उपोषण करणार असा इशारा निरगुडे गावचे सामाजिक कार्यकर्ते भगवानराव खारतोडे यांनी सबंधीत प्रशासनास दिल्यानंतर आठ मागण्यांपैकी एक मागणी खडकवासला वितरिका क्र.४१ पासून वितरिका क्र. ६० ब पर्यंत दुरुस्ती करणे ही मागणी मान्य झाली असून त्याला व इतर खडकवासला कॅनालच्या दुरुस्तीसाठी तसेच १४६ कि.मी. ते 202 कि.मी खडकवासला पाटबंधारे विभागाकडून ( ऐशियन डेव्हलपमेंट बँकेच्या) माध्यमातून दुरुस्तीसाठी ५१ कोटी ८५ लक्ष रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे तसेच या कामाची सुरुवात वितरिका क्रमांक ४१ (शेटफळगडे ) पासून होणार आहे तसेच इतर सात मागण्या बाकी आहेत तरी सबंधीत प्रशासनाने याची गंभीरपणाने दखल घेऊन राहीलेल्या मागण्या तात्काळ निकाली काढाव्यात अशी मागणी आता बळीराजाकडून जोर धरू लागलेली आहे.
इतर मागण्या पुढील प्रमाणे आहेत.
१) खडकवासला सिंचन प्रकल्पांच्या वितरिका दुरूस्ती,वितरिका ४१ पासून करण्यात यावी. (मागणी मान्य झाली. )
२) वितरिकेच्या शेवटच्या टोका पर्यंत पाणी गेले पाहिजे.( मागणी मान्य झाली.)
३) खरीप हंगामातील बाजरी कांदा सोयाबीन तूर पिक विमा दोन हप्ते शेतकरी खात्यात जमा करावेत.
३) खरीप हंगामातील दुष्काळ निधी ९ कोटी ८२ लाख रुपये वंचित शेतकरी खात्यात जमा करावा.
४) ज्वारीचा पिक विमा शेतकरी खात्यात जमा करावा.
५) पिके जळुन गेल्याने (खरीप, रब्बी , ऊस), संपूर्ण वीजबिल माफी करण्यात यावी.
६) इंदापूर तालुक्यातील पिके जळून गेल्याने संपूर्ण कर्ज माफी करण्यात यावी.
७) शेतकरी KYC करुन खरीप दुष्काळ निधी पैसे जमा झाले नाहीत त्या शेतकरी राजाचे पैसे DBT पोर्टल ने लवकरात लवकर खात्यावर जमा करावेत.
८) शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामात बियाणे व खते शासनाकडून मोफत देण्यात यावी
म्हणून १४ जून रोजी होणारे आमरण उपोषण स्थगित करून २१ जून रोजी निरगुडे तलाठी कार्यालयासमोर होणार होते. ते आता तात्पुरते स्थगित करत आहे परंतू इतर सात मागण्यांचा विचार सुद्धा वरीष्ठ पातळीवर होऊन त्याला न्याय देण्याचे काम प्रशासनाने करावे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ता तसेच शेतकरी भगवान खारतोडे यांनी माध्यमांनंसमोर दिली आहे.