शिरूर-हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध :- शांताराम कटके पक्षाने संधी दिली तर विधानसभा लढवणार.

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
          वाघोली(ता:हवेली)चे माजी,उपसरपंच तथा पुणे महानगरपालिका स्वीकृत सदस्य शांताराम कटके यांनी आज शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील सर्व पत्रकारांसोबत सुसंवाद साधत मनमोकळ्या गप्पा गोष्टी केल्या, त्यावेळी बोलताना कटके यांनी सांगितले की,शिरूर- हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वेसर्वा अजितदादांनी पवार यांनी संधी दिल्यास शिरूर-हवेली विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार आहे.
             आणि त्या दृष्टीने शिरूर- हवेली तालुक्यातील नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा देखील सुरू आहे. पक्ष वाढीसाठी प्रत्येक गावात अजितदादा यांच्या विचारांचे शिलेदार तयार केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मी राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असून अजितदादांनी वेळोवेळी दिलेली जबाबदारी योग्य रित्या पार पडली आहे.
             महायुतीकडून शिरूर-हवेलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे. पत्रकार हे कोणाला मोठं करतील आणि कोणाला छोटं करतील हे सध्या सांगता येत नाही, समाजकारण करत असताना पत्रकारांची साथ असणे खूप महत्त्वाचे आहे.त्या दृष्टीने आज दोन्ही तालुक्यातील पत्रकारांची एकत्रित संवाद साधला आहे.                 पत्रकारांकडून आम्हा राजकारण्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळत असतात,पत्रकार हा एक आरसा आहे तो आपल्याला योग्य असा मार्ग दाखवत असतो , मतदारसंघांमध्ये तरुणांना रोजगार मिळून देणार असून त्यामुळे घरात पैसा आला तर त्यांचे जीवन सुखी होईल तसेच त्यांच्या आई-वडिलांना देखील सुख लागेल हा प्रमुख उद्देश आहे, पक्षाने संधी दिली तर विधानसभा निवडणूक लढवणारच,त्यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या आधी पत्रकारांशी संवाद साधवा या दृष्टीने आजही सुसंवाद बैठक घेण्यात आली होती.या बैठकीला मोठ्या प्रमाणात शिरूर-हवेलीतील पत्रकारांनी चांगला प्रतिसाद दिला.यावेळी राष्ट्रवादीचे नेते शांताराम कटके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सोमनाथ आव्हाळे, यांच्यासह शिरूर हवेली तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!