भोर प्रतिनिधी- सुनिल साळवी
भोर शहराच्या मध्यवर्ती भागात आसणाऱ्या बसस्थानका मध्ये आज दिनांक १५ रोजी एक दुदैवी घटना घडली आहे. सदरील एसटी बस स्थानकात जात असताना एक इसम एसटी बसच्या चाकाखाली येऊन जागेवरती गतप्राण झाला आहे.
सदरील इसमाचे नाव रूपेश गायकवाड राहणार पोलादपूर जिल्हा रायगड असे आसून तो इसम बसस्थानकात जात आसताना बाहेरून आलेल्या बसच्या डाव्या बाजूच्या पुढच्या चाकाखाली येऊन त्याच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
सदरील घटनेचा पंचनामा भोरच्या पोलिसांनी केला आसून त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी त्या इसमाचा मृतदेह सरकारी तालुका ग्रामीण रुग्णालय भोर येथे नेहण्यात आला आहे.