शिक्रापूर (ता शिरूर)“शिक्रापूर पोलिसाची प्रशंसनीय कामगारी”शिक्रापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे साहेब त्यांच्या समवेत तळोले साहेब यांनी खाकीचे कर्तव्य बजावत असताना आपल्या कर्तुवाचा अनोखा ठसा उमटवत रस्त्यावर प्रसुती वेदना होणाऱ्या मातेला तात्काळ मदत करत रुग्णालयात घेऊन जात नवजात बालकाला आणि मातेला जीवनदान देण्यात यश प्राप्त केले.
या बद्दल *शिक्रापूर समस्या आणी उपाय ग्रुप* आणि समस्थ ग्रामस्थ शिक्रापूर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळेस शिक्रापूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री दिपरतन गायकवाड ,शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच श्री रमेशजी गडदे,ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रकाशजी वाबळे,निवृत्त पोलीस अधिकारी गिरमकर साहेब यांच्या सह शिक्रापूर समस्या आणी उपाय ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.