हवेली प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटेकर
केसनंद (तालुका हवेली) येथे श्री मरीआई माता व श्री महालक्ष्मी माता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.गेल्या अनेक वर्षापासून भग्न अवस्थेत व दुर्लक्षित असलेल्या श्री मरीआई माता व श्री महालक्ष्मी माता मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम व मूर्ती प्राण प्रतिष्ठापना समारंभ मोठ्या उत्साहात वाजत गाजत धार्मिक वातावरणामध्ये नुकताच संपन्न झाला,
केसनंद मधील हे मंदिर अनेक वर्षापासून दुर्लक्षित होते या मंदिराचा कायापालट आधुनिक विश्वकर्मा म्हणून परिसरामध्ये प्रसिद्ध असलेले दिलीप हरगुडे व त्यांचे सहकारी गणेश येवले यांनी ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून अतिशय देखने नयनरम्य व मनोहारी असे सुंदर मंदिर उभारणी करून खऱ्या अर्थाने केसनंद गावच्या वैभवामध्ये भर घातली आहे, दिलीप हरगुडे यांनी यापूर्वी गावातील भैरवनाथ मंदिर विठ्ठल रुक्मिणी श्री हनुमान व काळुबाई मंदिराची अशाच पद्धतीने उभारणी केली आहे आगामी काळामध्ये गावचे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी मातेचेही असेच मंदिर व्हावे अशी ग्रामस्थांनी याप्रसंगी अपेक्षा व्यक्त केली आहे