इंदापूरात आमच ठरलय बॅनर बाजीने विमान आकाशात झेप घेणार की;घड्याळाची टिकटिक वाजणार

Bharari News
0
पुणे जिल्हा प्रतिनिधी
           इंदापूर,२०१९ विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडून पुन्हा विधानसभा निवडणुक लढण्याचे संकेत देण्यात आले आहेत. सध्या इंदापूर मतदारसंघात अजित पवार गटाचे दत्तात्रय मामा भरणे हे आमदार असून महायुतीत ही जागा अजित पवार गटाला मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.तरी सुध्दा हर्षवर्धन पाटील यांच्याकडून विधानसभा निवडणुक लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आता समोर येत आहे.
आमचा स्वाभिमान आमचे विमान, आमचं आता ठरलंय, तयारी लागा अशा आशयाचे बॅनर इंदापूरात झळकले आहेत. हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांकडून ही बॅनर बाजी करण्यात आली असली तरी याला हर्षवर्धन पाटलांचा होकार असल्याचे आता समजत आहे. या बॅनरवरती विमान चिन्हाचा देखील उल्लेख करण्यात आल्याने हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणुक लढणार का ? असा सवाल देखील यानिमित्ताने आता उपस्थित केला जात आहे. कारण याआधी दोन वेळा हर्षवर्धन पाटलांनी विमान या चिन्हावर अपक्ष निवडणुक लढवली होती.

यातच सध्या महायुतीत विद्यमान आमदारांच्या जागा त्याच पक्षाला देण्यात येतील असं सुत्र ठरल्याची चर्चा आहे. त्यामुळेच इंदापूरची जागा अजित पवार गटाला जाण्याची शक्यता असल्याने हर्षवर्धन पाटलांनी सावध भूमिका घेतली आहे. यातच लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान हर्षवर्धन पाटलांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांची चर्चा केल्याचे दिसून आले होते. मात्र इंदापूर मधून सुनेत्रा पवारांना लीड मिळालं नसल्याने अजित पवार आता ही जागा सोडणार नाहीत. अशीही चर्चा दुसऱ्या बाजूला सुरू झाली आहे. असे असेल तर हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणुक लढण्यावर ठाम राहिले तर याठिकाणी तिरंगी लढत अटळ असल्याचे आता स्पष्ट होत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतून अजित पवार गटातील दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील सुद्धा इंदापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छूक आहेत. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपा मध्ये हा मुद्दा कळीचा ठरण्याची शक्यता आहे. महा विकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाला मिळणार असून इंदापूर बाजार समितीचे संचालक असलेले आप्पासाहेब जगदाळे हे तुतारी चिन्हावरती विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. तसेच गेले वीस वर्षे एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले पाटील व भरणे महायुती मुळे लोकसभेला एकत्र आले होते. परंतु विधानसभा निवडणुकीसाठी दोघे काय भूमिका घेणार ? ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!