300 उठा बैठका काढायला लावल्यामुळे विद्यार्थांच्या पायांना गंभीर आजार
शाळा म्हणजे विद्येचे माहेरघर की पैसे कमावण्यासाठी उभारलेले घर
लोणी काळभोर सचिन सुंबे
कदमवाकवस्ती (तालुका हवेली) येथील एक नावाजलेल्या शाळेत केस कापले नाही म्हणून बारा वर्षीय विद्यार्थ्यांना 300 उठा बैठका काढायला लावल्यामुळे विद्यार्थांच्या पायांना गंभीर आजार झाले आहेत . त्यामुळे त्या शाळेतील दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्या बाबतीत हलगर्जीपणा झालेला दिसून येत असून या शाळेतील अनेक त्रुटी पुढे आल्या आहेत . मिळालेल्या माहितीनुसार बारा वर्षीय विद्यार्थ्यांनी केस न कापल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना 300 उठा बैठका काढायला लावल्या होत्या त्यातील एका विद्यार्थ्यांने चार दिवसापूर्वी केस कापले होते .शाळेने नजरचुकीने त्या विद्यार्थ्यांला उठा बैठका काढायला लावल्याची कबुली दिली आहे .यावेळी पालकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली व शाळे विरुद्ध आंदोलन करणार असल्याचे सांगितले .
या विद्यार्थ्यांच्या पायांना गंभीर जखमा झाल्या असून चालताना खूपच त्रास होता. याबाबत शाळेतील शिक्षकांना पालकांनी विचारले असता शिक्षकांनी अरेरावीची भाषा केल्याने पालक आणखीनच संतप्त झाले आहेत . या शाळेचा प्रताप दिवसेंदिवस उघडीस येत असुन कधी एक महिन्याची फी भरली नाही म्हणून मुलांना घरी बसविले जाते तर कधी दहावीच्या परीक्षेला हॉल तिकीट फी मुळे देत नसल्याचे उघड झाले आहे .शाळा म्हणजे विद्येचे माहेरघर की पैसे कमावण्यासाठी उभारलेले घर असा सुर पालकांमधून येत आहे.