निपाणी प्रतिनिधी सागर श्रीखंडे
K.H.P.T. स्फूर्ती प्रोजेक्ट यांच्या वतीने महिलां व मुलींच्या साठी पोलीस स्टेशन चे कामकाज कशा पध्दतीने चालते व आपातकालीन वेळी फायर ब्रिगेड कशा पध्दतीने काम करते याची माहिती घेण्याच्या उपक्रम स्फूर्ती प्रोजेक्ट यांच्या वतीने राबवण्यात आला.
यावेळी फायर ब्रिगेडचे प्रमुख अधिकारी यलाप्प कोजलगी यांनी घरगुती काही अपघात झाल्यास जर महिलांनी प्रमुख भूमिका घेऊन पुढाकार घेतला तर समाजातील कित्येक अपघात घडण्यापासून आपण रोखू शकतो पण दुर्देवाने आपत्काळात काय उपाय करायचे हेच महिलांना माहिती नसल्याने आज मोठे अपघात घडत आहेत असे सांगितले.यावेळी स्पूर्ती प्रोजेक्ट यांच्या उपक्रमाचे कौतुक केले व असे उपक्रम इतर ही महिला मंडळ यांनी घ्यावे असे आव्हान केले.
यावेळी शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरक्षक उमादेवी मॅडम यांनी ही महिलांना पोलीस स्टेशनचे कामकाज कशा पध्द्तीने चालते याची माहिती दिली यावेळी psi मॅडम म्हणाल्या की आज महिलांनी घर सांभाळत समाज आणि राष्ट्र ची जबाबदारी घेतली पाहिजे यासाठी आमच्याकडून आपल्याला सर्व सहकार्य मिळेल तसेच महिलांनी व मुलींनी कुठल्याही प्रकारच्या अन्याय सहन करून घेऊन नये व कोणावर अन्याय होत असेल तर पोलीस प्रशासन चां मदतीने त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करायला हवे असे मत यावेळी व्यक्त केले.
शहर पोलिस स्टेशनचे psi उमादेवी मॅडम,हवालदार केंपणावर काँस्टीबल श्रीशेल होसमनी तर फायर ब्रिगेड चे उदय पट्टन, रवी हेगडे तसेच K.H.P.T स्फूर्ती प्रोजेक्ट चे प्रमुख विनायक चौगुले, सुमित्रा मिरजे,लक्ष्मी दोडमनी, स्मिता हेब्बाल, श्वेता हिरेमठ यांच्या प्रमुख उपस्थित होती यावेळी सोमया हांदिगुड, जया पटेल, सुमन हांदिगुड, राजेश्री मगदूम, अनुश्री हुंचली, सुहाना मुल्ला, साक्षी चती सह परिसरातील मुली व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या