जुन्नर प्रतिनिधी सचिन थोरवे
विद्यार्थ्यांची शालेय गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते नुकताच परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला असून विद्या विकास मंदिर राजुरी या शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला असून 27 विद्यार्थी हे स्कॉलरशिप मध्ये उत्तीर्ण होऊन तालुक्यामध्ये स्कॉलरशिप परीक्षेत शाळेला द्वितीय क्रमांक भेटला असल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक जीके औटी सर यांनी बक्षीस वितरण समारंभ वेळेस सांगितले.
यशस्वी विद्यार्थ्यांना पुढेही प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामस्थांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते स्कॉलरशिप मधील यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा सत्कार विद्या विकास मंदिर राजुरी या ठिकाणी कंपास आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला .यावेळी राजुरी चे ग्रामस्थ डी बी गटकळ, लोकमतचे पत्रकार चंद्रकांत औटी, जुन्नर तालुका युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन थोरवे त्याचप्रमाणे राजुरी गावातील अनेक संस्थांचे पदाधिकारी शाळेतील सर्व शिक्षक आणि शालेय प्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.
स्कॉलरशिप परीक्षेत यश संपादन संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना डी बी गटकळ सचिन थोरवे यांनी शुभेच्छा दिल्या आणि मुख्याध्यापक जीके औटी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सर्वांचे आभार मानले.