पुणे जिल्हा प्रतिनिधी
आज दि. २८ जुलै रोजी धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज दुपारी. ३.०० वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्या वरून मुठा नदी पात्रामध्ये ५१३६ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व वेळेनूसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी. तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी.सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.
अशी माहिती
कार्यकारी अभियंता. खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे यांनी माध्यमांच्या माध्यमातून नदीकाठच्या नागरिकांना दिली आहे