सुनील भंडारे पाटील
पुणे नगर महामार्गावर पेरणे फाटा (तालुका हवेली) येथील चौकात लोखंडी विजेचा खांब
अनेक दिवसांपासून धोका द्यायक रित्या उभा आहे, या खांबामुळे अनेक लहान मोठे अपघात घडले आहेत, या खांबापासून धोका होऊ नये म्हणून ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने संरक्षण कठडा बसवण्याची मागणी करण्यात आली होती ही मागणी मान्य करण्यात आली आहे,
संबंधित विजेचा खांब पुणे नगर महामार्गावर पेरने फाट्याच्या मुख्य चौकात रस्त्याच्या मधोमध असून रात्रीच्या वेळी दुचाकी चार चाकी तसेच इतर वाहन चालकांना उच्च दाब विद्युत वाहक खांब मधोमध उभा असल्याने या खांबाला धडकून किंवा वाचवताना आतापर्यंत अनेक अपघात घडलेले आहेत, महावितरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांना संबंधित विद्युत खांब हलवण्यासाठी ग्रामपंचायत पेरणे यांनी अनेकदा पत्र व्यवहार केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने निर्णय घेऊन खांबाला संरक्षक कठडा बसवण्याची मागणी मान्य करण्यात आली,
तसेच सार्वजनिक विभागाच्या वतीने या ठिकाणची पाहणी करण्यात आली, या प्रसंगी पीडब्ल्यूडीचे अभियंता कदम, साईनाथ वाळके पाटील (वरिष्ठ उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा), दशरथ वाळके पाटील (भाजपा हवेली तालुका अध्यक्ष क्रीडा विभाग) व संरक्षण कठडे बसवणारे ठेकेदार हजर होते सदर काम करण्याच्या सूचना याप्रसंगी देण्यात आल्या, असून लवकरात लवकर संबंधित विद्युत खांबाच्या संरक्षण कठड्याचे काम पूर्ण होईल असे कदम यांनी सांगितले,