सुनील भंडारे पाटील
पेरणे,बकोरी(ता. हवेली) येथील ग्रामसडक योजनेतून अधिक रक्कमेच्या निधीतून मंजूर झालेल्या पेरणे-कोळपेवाडी-बकोरी रस्त्याचे काम चालू होऊन कोळपेवाडी परिसरात सबंधित कंत्राटदार यांनी रस्ता उकरून ठेऊन गेले १५ दिवस झाले असून या रस्त्याचे काम ऐन पावसाळ्यात थांबविल्याने रस्त्यावर खडी,मुरूम वर आल्याने येथून येजा करताना पेरणे व बकोरी परिसरातील ग्रामस्थांना अडचणी निर्माण होत असून येथे अपघात वाढत आहेत,
काम थांबविलेल्या रस्त्याची पाहणी पेरणे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.यावेळी सरपंच उषा दशरथ वाळके,उपसरपंच उपसरपंच नंदा ढवळे,माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रां. पं.सदस्य अक्षय वाळके,सदस्य सुजित वाळके,माजी उपसरपंच तथा सदस्य गणेश येवले,सारिका वाळके,भानुदास कोळपे,बाळासाहेब मालव,माजी उपसरपंच सोपान गायकवाड,तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष दशरथ वाळके,शिवाजीराव येवले,भानुदास कोळपे,माजी उपसरपंच संग्राम हाके,संतोष कोळपे,बाळासाहेब मल्हाव,माजी उपसरपंच सोपान गायकवाड,संतोष कोळपे,यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
रस्ता खोदून ठेवल्याने रहदारी करण्यास नागरीकांची गैरसोय होत असल्याने यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी हे सबंधित कंत्राटदार दिपक जाधव यांच्या विरोधात आक्रमक झाले असल्याची यावेळी माहिती पेरणे गावच्या लोकनियुक्त सरपंच उषा दशरथ वाळके,उपसरपंच नंदा ढवळे,माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य अक्षय वाळके,सुजित वाळके,आदींनी माध्यमांना दिली.
या रस्त्याचे कोण कंत्राटदार काम करीत आहे याबाबत आम्हाला कल्पना नसून कंत्राटदार याने चालू केलेले रस्त्याचे काम न थाबविता अधिक गतीने पुढे करायला हवे आहे.याबाबत सबंधित रस्ते बांधकाम अभियंता यांच्याशी संपर्क साधून याबाबत संपर्ण माहिती घेणार आहे.
अशोक बाप्पु पवार,आमदार-शिरूर - हवेली