भोर प्रतिनिधी सुनिल साळवी
संपूर्ण महाराष्ट्र पांडुरंग चरणी लिन , भोर तालुक्यातील बहुतेक शाळांमध्ये दिंडी सोहळा आज रोजी साजरा करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या करत आहेत.
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा या अभंगाप्रमाणे तुझा आम्हाला कधीही विसर पडू नये . पांडुरंगा आमच्या हृदयात मनामनामध्ये कायम आहेस संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्माई यांनी जणू बाल रूपात आपणास दर्शन घडते , टाळ ,मृदुंग ,अभंग ऐकल्यानंतर जणू महाराष्ट्राचा एक मोठा सण उत्सव साजरा होतो. माणसांना आयुष्यात एकदा तरी पायी दिंडीला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्याचे सुख इतर कशा मध्येही नाही.
या दिंडी सोहळ्यामध्ये भोर तालुक्यातील बहुतेक शाळांनी सहभाग घेतला होता याचे नियोजन भोर परिसरातील आप आपल्या शाळेतील शिक्षक यांनी केले होते यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थीनींनी मोठया प्रमाणात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे.