पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा. जरांगे पाटलांचा बालेकिल्ला थोड्याच दिवसात पश्चिम महाराष्ट्रात धडाडणार मराठ्यांची बुलंद तोफ
पहिल्या टप्प्यातील मराठवाड्यातील शांतता रॅली आणि ओबीसी आरक्षण जनजागृती निमीत्ताने काढलेल्या प्रत्येक जिल्ह्यातील अभुतपुर्व यशानंतर मराठा संघर्ष योद्धा मा.मनोज जरांगे पाटील यांचा दुसऱ्या टप्प्यातील पश्चिम महाराष्ट्रातील होणाऱ्या शांतता रॅली आणि मराठा समाजाला ओबीसी आरक्षणासाठी जागृत करण्यासाठी येत्या पुढील काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांचा दौरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हावार शांतता रॅलींच्या तारखा खालील प्रमाणे आयोजित करण्यात आल्या आहेत.
सोलापूर जिल्हा
7 ऑगस्ट 2024
सांगली जिल्हा.
8 ऑगस्ट. 2024
कोल्हापूर जिल्हा.
9 ऑगस्ट 2024
सातारा जिल्हा.
10 ऑगस्ट 2024
पुणे जिल्हा.
11 ऑगस्ट 2024
अहिल्यानगर जिल्हा.
12ऑगस्ट 2024
नाशिक जिल्हा.
13ऑगस्ट 2024
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागण्यांसाठी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात जरांगे पाटील यांची मुलूख मैदानी तोफ दि. ७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट पर्यंत धडाडणार आहे, तसेच सरकारला मराठा समाजाला ओबीसीमधून ५० टक्केच्या आतूनचं आरक्षण दयावचं लागेल अन्यथा कोणतेही सरकार मराठ्यांच्या मतांशिवाय सत्तेत येऊ शकत नाही असे यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले आहेत.