कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सहा विद्यार्थ्यांनी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत बाजी मारली. यशस्वी विद्यार्थ्यांना सुरेश सातपुते व इंदुमती शेळके या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थी- विराज बवले(नवोदय निवड )उदय सातपुते, तन्मय घाडगे, सिद्धेश वाळके, वेदांगी महाजन, वैष्णवी स्वामी.
या गुणवंत विदयार्थ्यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सुमिता गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सरपंच संदीप गव्हाणे, उपसरपंच सविता घावटे,मा. सरपंच विजय गव्हाणे,मा. उपसरपंच गणेश कांबळे, पोलीस पाटील मालन गव्हाणे,ग्रामपंचायत सदस्य मनिषा गव्हाणे, वंदना गव्हाणे, अर्चना सुपेकर, कोमल खलसे,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष गणेश गव्हाणे, शिक्षणतज्ञ गजानन गव्हाणे,सदस्य मनिषा तापकीर, पूनम लांडगे, सारिका भांडवलकर, संध्या कुंभार,उषा भारती, शालिका जाधव, मारोती पिंपळपल्ले,केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर,मुख्याध्यापक कुसुम बांदल, उषा भंडारे, शिक्षकवृंद, पालक ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयमाला मिडगुले, प्रास्ताविक उषा भंडारे तर आभार तुकाराम सातकर यांनी मानले.