पुणे नगर महामार्गाचे वाघोली पासून शिक्रापूर पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले हे रस्त्याचे रुंदीकरण होत असताना वाघोली पासून शिक्रापूर पर्यंत जवळपास 90% पेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे परंतु लोणीकंद गावामध्ये रस्त्याचे रुंदीकरण का रखडले आहे हा प्रश्न मात्र अनुत्तरीच आहे,
एकीकडे वाघोली शिक्रापूर कोरेगाव भीमा सणसवाडी अशा मोठ्या गावामध्ये गावामध्ये रस्त्याचे रुंदीकरण झाले मात्र लोणीकंद गावांमध्ये रस्त्याचे रुंदीकरण का थांबले यामागे कोण आहे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे,
याच लोणीकंद मधील रस्त्याच्या रुंदीकरणा बाबत सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव भोंडवे यांनी उपोषण देखील केले होते यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे रुंदीकरण करत रस्त्याचे काम करणार असल्याचे आश्वासन दिले होते मात्र हे आश्वासन देखील हवेत विरंग उडून गेल्याचे बोलले जात आहे
याच बाबतीत एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की लोणीकंद मधील कामाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना अनेक वेळा भेट घेत मार्ग काढण्याची विनंती केली परंतु अद्याप पर्यंत याला यश आले नाही,