सर्व सामाजिक कार्यात नावलौकिक असणारी अश्या (शिक्रापूर ता.शिरुर जि.पुणे) ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी उपसरपंच सारिका ताई सासवडे
ग्रा. प. सदस्य सुभाष मामा खैरे ,प्रकाश वाबळे, त्रिनयन कळमकर ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे साहेब ,तलाठी गायकवाड मॅडम ,अंगणवाडी सेविका सुपर वायझर गायत्री टिकले उर्फ धावडे मॅडम,ऍड राजेश धुमाळ,सोनु आळंदीकर सर्व अंगणवाडी सेविका तसेच मोठया संख्येने महिला माता भगिनी व कर्मचारी उपस्थित होते याप्रसंगी मनोगत व्यक्त करीत असताना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेविषयी माहिती देण्यात आली आणि अर्ज भरण्यात आले.सदर योजना ग्रामपंचायत मध्ये दिनांक 11/7 ते 13/7/2024 पर्यंत चालू राहणार आहे त्यानंतर सर्व अंगणवाडीमध्ये 31 ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म भरून घेण्यात येणार आहे तरी निकषात बसत असलेल्या माता भगिनी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशा प्रकारची माहिती देण्यात आली