निघोजे ग्रामपंचायत उपसरपंच पदी छाया येळवंडे बिनविरोध

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर 
              येथील निघोजे (तालुका खेड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छाया बाबासाहेब येळवंडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामविकास अधिकारी व्हि. एल. गाडीलकर यांनी सांगितले. निघोजे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच इंदिरा फडके यांनी आपल्या पदाचा राजीनामा इतर सदस्यांना या पदावर काम करण्याची संधी मिळावी यासाठी राजीनामा दिला होता. या मुळे उपसरपंच पदाची एक जागा रिक्त होती. या उपसरपंच पदाचा राजीनामा मंजूर झाला होता. राजीनामा दिल्या नंतर रिक्त पदाच्या निवडी साठी सरपंच सुनीता येळवंडे यांच्या अध्यक्षते खाली निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.
            यावेळी मुदतीत अर्ज भरण्याच्या वेळेत छाया येळवंडे यांचा एकमेव अर्ज आला होता. तो अर्ज वैध ठरला. एका जागेसाठी एकच अर्ज आल्याने उपसरपंच पदी छाया येळवंडे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच तथा पीठासीन अधिकारी सुनिता येळवंडे यांनी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय आंद्रे, अजित येळवंडे, समाधान येळवंडे, सागर येळवंडे , दिपक कांबळे, प्रियांका आल्हाट, रुपाली येळवंडे, इंदिरा फडके, मनिषा बेंडाले, स्नेहा फडके, ग्रामविकास अधिकारी व आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व निघोजे गावातील ग्रामस्थ, सेवक कर्मचारी यांच्या वतीने पुष्पगुच्छ व पुष्पहार देऊन नवनिर्वाचित उपसरपंच छाया येळवंडे यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!