गाव खानापूर. तालुका भोर, जिल्हा पुणे येथील तरुणांची. आजची तरुण पिढी हे व्यसनाधीन होत आहे. नको त्या वाईट सवय लागत आहेत. मोबाईलच्या विळख्यात अडकत आहे . पण याला अपवाद आहे ती खानापूर गावची तरुण पिढी. . ग्लोबल वार्मिंग चा धोका वाढत असताना पृथ्वीवरचे झाड हे कमी होत असताना यांनी नवीन उपक्रम चालू केला आहे .50 झाडे लावण्यापासून 5 वर्षापूर्वी चालू केलेली प्रवास सुरुवात आज 1 हजार झाडे लावण्यापर्यंत पोचली आहे. तर ही तरुण पिढी करते काय ज्यावेळी त्यांना कामातून, शाळेचा अभ्यास पूर्ण करून मिळाल्या वेळ गावातील मंदिरांची साफसफाई करणे पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ करणे, गावातील गटारे साफ करणे, व्यायाम करणे तालीम करणे असा त्यांचा नियमित दिनचर्या दिनक्रम ठरलेला. . गावातील वयस्कर वयोवृद्ध तरुण पिढीच्या मार्गदर्शन घेऊन प्रत्येक वर्षी समीर कदम आणि त्यांची युवा टीम आंब्याची कलम बांधणे .औषधी वनस्पतींच्या बिया शोधून काढणे. माती गोळा करणे माती पिशवीमध्ये भरणे त्याचा बी रोपण करणे. उगवलेल्या रोपाना पाणी देणे आणि ती झाडे माळरानावरती गावातल्या वनविभागाच्या हद्दीत लावणे.
आणि यासाठी धावून येतात ते गावातले गावकरी .भैरवनाथ तरुण मंडळ . गावातील शिदोजी थोपटे महाविद्यालयाचे शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी. आणि गावातील तरुण वर्ग यांच्या सहकार्यातून यंदा 1000 रोपांची लागवड करण्यात आली . प्रत्येक वर्षी कमीत कमी पाच ते दहा हजार फळझाडे, औषधी वनस्पती तयार करून ती सर्वसामान्य लोकांना फुकट वाटण्याचा मानस आहे. परंतु यासाठी गरज आहे ती त्यांच्या पाठीवर थाप मारण्याची. मदतीच्या हातांची, रोप वाटीका तयार करण्याची.