सुनील भंडारे पाटील
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्रीं आहेत. २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. महाराष्ट्र हे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील तिसरे सर्वात मोटे राज्य असून, देवें्र फडणवीस यांच्या सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली राज्याने औद्योगिक उत्पादनाच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेत. आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्य अशी ओळख निर्माण केली.
आपल्या अभ्यासू आणि व्यासंगी स्वभावाला अनुसरून त्यांनी कायद्यातील पदवी. उद्योग व्यवसथापन या विषयात पदव्युत्तर पदवी आणि बर्लिनमधल्या डीएसई संस्थेमधून प्रकल्प व्यवस्थापन या विषयात पदविका प्राप्त केली आहे, 1992 साली फारच कमी वयात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली, भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण महापौर होण्याचा मान त्यांनी पटकावला. ते नागपूरचे सवोंत तरुण महापौर आहेत आणि 'मेयर इन कौन्सिल' या पदावर पुन्हा निवडून आलेले एकमेव व्यक्ती आहेत सलग ५ वेळा ते महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आहेत. जनतेचा नेता असा लौकीक त्यांनी कमावला आहे,
राज्य विधीमंडळाच्या अधिवेर्नांमध्ये सदनातील उत्साही आणि अभ्यासू सदस्य म्हणून त्यांचा वावर जाणवत राहतो. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचा सवोत्कृष्ट संसदपटू पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. जपानच्या ओसाका सिटी युनिव्हर्सिटीने त्यांना मानद डॉक्टरेट बहाल केली आहे. १२० वर्षे जुन्या अशा या विद्यापीठाने आतापयंत जगातील केवळ दहा प्रतिष्ठित व्यक्तींना ही सर्वोच्च मानद पदवी प्रदान केली आहे आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-आर्थिक विकासात मोलाचे योगदान देणारे देवेंद्र फडणवीस, हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय आहेत,
अजित दादा पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्व, हे असे नाव आहे ज्या नावाची चर्चा
प्रसार माध्यमांमध्ये नेहमी होतच राहते,राजकारणामध्ये
साखर कारखान्याचे संचालक ते राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत आणि आता
विरोधी पक्ष नेते म्हणून दादांची राजकीय वाटचाल ही दैदिप्यमान व
प्रेरणादायी आहे, राजकारणाचे व समाजकारणाचे बाळकडू त्यांना घरातूनच
मिळाले,
अनेक विषयांचे सखोल ज्ञान, वस्तुनिष्ठ दृष्टिकोन, प्रभावी निर्णय क्षमता, प्रशासनावर पकड, प्रचंड कार्यक्षमता, स्पष्टोक्तीपणा, आणि वक्तशीरपणा या गुणांच्या जोरावर त्यांनी राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले,
परंपरागत राजकारणी म्हणून आपली ओळख न ठेवता स्वतःची कार्यशैली जपणारा व दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे,
प्रतिकूल
परिस्थितीतही ते हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेतात, विजय मिळेपर्यंत लढत
राहणे हा त्यांचा स्वभाव आहे, तसेच विरोधकांच्या टीका ह्या
त्यांच्यावर नेहमी सुरूच असतात, तरीही ते त्या टिकांना सामारे जाऊन
विकासकामांत अडथळा येऊ देत नाहीत, आणि विकास कामे सतत सुरु ठेवतात.अजितदादा पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मोठे नेते असुन शरद पवार
यांचे पुतणे आहेत.
अजितदादा पवार यांचा अल्पपरिचय
नाव: | अजित अनंतराव पवार |
जन्म: | 22 जुलै 1959 |
जन्मस्थान: | देवळाली प्रवरा, राहुरी, अहमदनगर |
शिक्षण: | बी.कॉम. |
व्यवसाय: | राजकारण |
उपमुख्यमंत्री म्हणुन कार्यकाळ : | 2010 ते 2014 |
निवासस्थान: | सहयोग, बारामती पुणे |
वडिल: | अनंतराव पवार |
काका: | शरद पवार |
चुलत बहिण: | सुप्रिया सुळे |
पत्नी: | सुनेत्रा पवार |
अपत्य: | पार्थ पवार, जय पवार |
अजित पवार राजकारणातले एक महत्वाचे राजकीय नेते आहेत,यांचा जन्म देवळाली प्रवरा (ता.राहुरी जि.अहमदनगर) या त्यांच्या गावी झाला, महाविद्यालयीन शिक्षणाकरता त्यांनी मुंबई
गाठली. शिक्षण पुर्ण केल्यानंतर परत बारामती येथे जाऊन सहकारी
संस्थांमध्ये त्यांनी सामाजिक आणि राजकीय कार्य करण्यास सुरूवात केली.अजित
पवार यांना ’’दादा’’ अशी ओळख आहे. सर्वजण त्यांना याच नावाने ओळखतात.
त्यांचे वडिल अनंतराव पवार यांनी सुरूवातीच्या काळात व्ही.शांताराम यांच्या
’’राजकमल स्टुडिओ’’ करिता काम केले होते.
अजित पवार यांचे आजोबा बारामती येथे सहकारी व्यापार करीत असत तर आजी शेती करायची. अजित पवारांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाल्याने शिक्षण सोडुन ते पुन्हा बारामतीला आले आणि कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली,
१८८२ साली सहकारी साखर कारखान्याच्या मंडळावर ज्यावेळी ते निवडुन आले तेव्हां त्यांनी राजकारणात प्रवेश केला. २०१० ते २०१४ या काळात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणुन देखील जवाबदारी त्यांनी सांभाळली आहे.
अजित पवार हे आज अनेक सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक पदावर आहेत. या व्यतिरीक्त भवानी नगर ता. इंदापुर जि. पुणे
येथील छत्रपती शिक्षण संस्थेचे संचालक म्हणुन ते काम पहातात. पुण्यातील
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक पदावर देखील ते कार्यरत आहेत.या व्यतिरीक्त देखील अनेक उच्चपदांचा पदभार ते सांभाळत आहेत.