आजकाल आपण पाहतो हार फुले देऊन सत्कार करण्यात येतो पण काहितरी वेगळेपण जपुन गरजु वस्तु गरजु लोकांपर्यंत पोहोचेल असा मानस धरुन मा .खासदार साहेब व आमदार साहेब यांची वहितुला करून त्या वह्या श्री छत्रपती प्रतिष्ठान स्वयंचलित निवासी मतिमंद कार्यशाळा शिक्रापूर (तालुुका शिरूर) येथील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
त्याप्रसंगी संसदरत्न खासदार डॉ अमोल कोल्हे व शिरूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अँड अशोक बापु पवार यांनी मनोगत व्यक्त केले .
यावेळी बोलताना "रील जीवनात खूप वेळा तुला झाली पण माझ्या रियल जीवनात प्रथमच वहीतुला झाली याचा मनापासून आनंद आहे' असे प्रतिपादन खासदार साहेबांनी दिले.
यावेळी तालुका अध्यक्ष विश्वास काका ढमढेरे शिरूर आंबेगाव विधानसभा अध्यक्ष शेखर दादा पाचुंदकर शिक्रापूर नगरीचे माजी सरपंच आबासाहेब करंजे, महात्मा फुले समता परिषदेचे संघटक सोमनाथ भुजबळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती काकासाहेब कोरेकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित आप्पा दरेकर ,राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस माऊली आबा थेऊरकर ,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सुदीप शेठ गुंदेचा, बुरुंजवाडी सरपंच दत्तात्रय टेमगिरे ,तळेगाव नगरीचे उपसरपंच राकेश भुजबळ, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष निलेश थोरात ,शिक्रापूरच्या उपसरपंच सारिका ताई सासवडे माजी उपसरपंच सुभाष मामा खैरे, विशाल खरपुडे,डॉक्टर पवन सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते विशाल गायकवाड, सिद्धार्थ सोनवणे ,गुलाब राव सासवडे सीमाताई गुट्टे,रमा आठवले संगीता तिवारी,शिक्रापूर नगरीतील सर्व आबालवृद्ध उपस्थित होते, तसेच शिक्रापूर गावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पूजाताई दीपक भुजबळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले प्रास्ताविक सोमनाथ भुजबळ यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण सर यांनी तर आभार उमेश दरवडे यांनी मानले.