सामान्य नागरिकांची हाक मयत आणि दहाव्यातील लांबलचक श्रद्धांजली देणे बंद करा-उरळीकांचन परिसरात झळकले बॅनर

Bharari News
0
उरुळी कांचन प्रतिनिधी नितीन करडे 
           उरुळी कांचन (तालुका हवेली) ग्रामस्थांच्या वतीने दहावा तसेच मयत मध्ये लोकनेत्यांच्या लांबलचक भाषणांमुळे वैतागून स्मशानभूमी परिसरात भाषण बाजी बंद करण्यासाठीचे तीन ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत, लोकनेत्यांच्या या सवयीचा परिसरातील अनेक गावांमध्ये नागरिकांना त्रास होत आहे, ही भाषणबाजी तातडीने थांबवावी अशी मागणी नागरिक करत आहेत, 
               मयत आणि दहावा हा त्या कुटुंबासाठी आणि नातेवाईकांसाठी खूप मोठा दुःखाचा प्रसंग असतो. त्यात लांबलचक श्रद्धांजलीच्या भाषणामुळे जमलेल्या लोकांना ताटकळत थांबावे लागते. लांबलचक भाषनदाराला स्व:ताची वाव्हा मिळण्यासाठी नागरिकांना वेठीस धरुन भावनेशी खेळताना थोडी देखील जाणीव होत नाही समोर बसलेली लोकं अक्षरशा शिव्या घालतात,
                   निवडणुका तोंडावर आल्यावर तर अशा भाषण बाजाणा तर जोरच येतो, लोकनेत्यांना व राजकीय पुढार्‍यांना तसेच इतर व्यक्तींना संबंधित ठिकाणी आयते व्यासपीठ भेटते, एखाद्याला भाषण येत नसले तरी त्याला बळच उठून दोन शब्द बोलायला लावण्याचा प्रकार देखील या भागात घडत आहे, 
                 लोकांना जमा करायची गरज नाही, लोकांचा मोठा जनसमुदाय समोर असतो, आईता माईक असतो, साऊंड सिस्टिम असते एवढे सगळे फुकट मिळाल्यावर यांना भान राहीलच कसे? अशी परिस्थिती उरळीकांचन तसेच आजूबाजूच्या गावात देखील पाहायला मिळत आहे, लोकांना भाषणांच्या वाढत्यावेळामुळे मयत व्यक्तीच्या नातेवाईकांची देखील भेट घेता येत नाही,
                 एक सर्वसामान्य ग्रामस्थ राजू कांचन यांनी सांगितले की भाषण ठोकणारे यांनी कधीही मयत व्यक्तीच्या कुटुंबाची भेट घेतली नाही, त्याच्या घरी गेले नाहीत, कधी अडचण विचारली नाही, कर्ज आहे की काय याची चौकशी केली नाही, कसलीही मदत नाही अशी लोकं कसलेच भान न ठेवता दनादन भाषण ठोकत आहेत, असल्या प्रवृत्तीचा मी निषेध करतो, तसेच ही भाषण बंद करण्याची त्यांनी मागणी यावेळी केली,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!