सुनील भंडारे पाटील
संपूर्ण राज्यातून तसेच पुणे जिल्ह्यातून कायम चर्चेत असणारा शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ, चांगल्या राजकीय रथी महारथींची लक्ष वेधून असणाऱ्या या मतदारसंघाची तोंडावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवाराची जागा महायुतीच्या अजितदादा पवार जाणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सध्या रंग धरू लागली आहे,
राजकीय वर्तुळामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अनेक बदल होत आहेत, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमुळे नागरिकांना बरेच काही अनुभव आले, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अष्टपैलू असणारे नेतृत्व अजित दादा पवार यांनी विद्यमान आमदार अशोक बापू पवार यांना " कसा आमदार होतो तेच बघतो " अशा पद्धतीचे वक्तव्य केले होते, हा मुद्दा जनतेमध्ये खूप चर्चेत आला होता, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अशोक बापू पवार यांना चॅलेंज करण्यासाठी अजितदादा गटाकडून आयात नसलेला स्वतःचा मुरब्बी उमेदवार रिंगणात उतरणार आहे,
लोकसभा निवडणुकी वेळी जागा अजितदादा गटाला मिळाली होती, परंतु ऐन निवडणुकीच्या काळात उमेदवार आयात केल्याने, याचा परिणाम मतदानावर झाला, त्यामुळे तीच चूक पुन्हा झाली तर पायावर धोंडा पाडून घेतल्यागत होईल, अजित दादांनी आयात उमेदवार घेऊ नये असा जनतेमध्ये सूर आहे,
सध्या शिरूर मधून अजितदादा पवार गटाचे दादा पाटील फराटे, तर शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातून चंदन सोंडेकर, तसेच हवेली मधून वाघोलीचे शांताराम कटके हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दंड थोपटून तयार आहेत, त्यामुळे या आगामी विधानसभा निवडणुकीत अजित दादा पवार काय निर्णय घेतील याची चर्चा जनतेमध्ये सध्या जोर धरू लागली आहे,