वाहनाचा चॉईस नोंदणी क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करण्याचे आवाहन

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
          पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यक्षेत्रात नागरिकांना व वाहनधारकांना पसंतीचा नोंदणी क्रमांक घरबसल्या व सहज उपलब्ध होण्याकरीता 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या सुविधेअंतर्गत नागरिकांना एमएच-१४ मधील सध्या सुरू असणाऱ्या मालिकेमधील उपलब्ध क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करता योणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या पसंती क्रमांकासाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. तसेच ऑनलाईन पद्धतीने क्रमांक आरक्षित करतांना निर्धारित शासकीय शुल्कदेखील तात्काळ ऑनलाईन अदा करता येणार आहे. ही सुविधा शासनाच्या https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने पसंती क्रमांक आरक्षित केल्यानंतर त्याची प्रत संबंधित वाहन वितरक यांना नोंदणी क्रमांक जारी करण्याकरीता देण्यात यावी.

नवीन वाहन मालिका सुरू करतावेळीची कार्यपद्धती या पूर्वीप्रमाणेच राहील. एका पसंती क्रमांकाकरीता एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास कार्यालयात लिलाव करून पसंती क्रमांक उपलब्ध करून देण्यात येईल. या सुविधेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!