सुनील भंडारे पाटील
संतुलन संस्थेच्या वतीने तुळजाभवानीनगर खराडी पुणे येथे ॲक्युप्रेशर शिबिराचे आयोजन दि.20 जुलै ते 26 जुलै पर्यंत करण्यात आले असून यामध्ये डोळे, कान, डोके, गुडघे दुखी, मधुमेह, रक्तदाब, स्थूलपणा पॅराललीसस, मानसिक तणाव, डिप्रेशन इत्यादी आजारांवर ॲक्युप्रेशर पद्धतीने उपचार करण्यात येणार आहेत,
राजस्थानचे डॉक्टर टी आर चौधरी व डॉक्टर के एस राज पुरोहित या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून मोठ्या संख्येने महीला, पुरुष, मुले, मुली व युवा लाभ घेत आहेत. पारंपारीक व नैसर्गिक पद्धतीने शरीर चांगल ठेवता येईल तेवढे प्रयत्न करावेत व जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संतुलन संस्थेचे संस्थापक एडवोकेट बी.एम रेगे व संचालिका एडवोकेट पल्लवी रेगे यांनी केले आहे.