सुनील भंडारे पाटील
पुणे नगर महामार्ग लगत कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथे ऐन पावसाळ्यात धोकादायक असे खड्डे तयार झाल्याने लहान-मोठे अपघात होऊ लागले होते ही बाब लक्षात येताच कोरेगाव भीमा ग्रामपंचायतच्या वतीने तातडीने पावले उचलून संबंधित खड्डे तातडीने बुजवण्यात आले,
सरपंच संदीप ढेरंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे नगर महान मार्ग अलगत दोन ठिकाणी मोठे खड्डे तयार झाले होते, सद्यस्थितीत पाऊस होत असल्याने या खड्ड्यात पाणी साठल्याने खड्डे दिसेनासे होत होते, त्यामुळे दुचाकी तसेच चार चाकी गाड्या यामध्ये अडकत होत्या, दुचाकी गाड्या आपटून कित्येक गाड्या पडल्याने, संबंधित ठिकाणी अजूनही अपघात होण्याची शक्यता असल्याची माहिती सरपंच ढेरंगे यांना मिळाल्यानंतर तातडीने या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली असून चालकांनी सुटकेचा श्वास सोडला, आज सकाळी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांद्वारे कोरेगाव भीमा चौकातून वढू बुद्रुक रस्त्याला वळणाऱ्या पॉईंटवर तयार झालेले हे खड्डे सिमेंट खडी च्या साह्याने बुजवण्यात आले, हे खड्डे बुजवल्याने कोरेगाव भीमा ग्रामपंचायत तसेच सरपंच संदीप ढेरंगे यांचे आभार मानण्यात आले,