सुनील भंडारे पाटील
वाढता वेग व अपघात या सर्व गोष्टींचा विचार करून वढू बुद्रुक (तालुका शिरूर) कोरेगाव भीमा रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची गरज पाहता भरारी न्यूजने वृत्तांकन करून ही बाब प्रशासनाच्या समोर आणली त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला डोळे उघडून खडबडून जाग आली तसेच संबंधित रस्त्यावर गतिरोधक टाकण्यात आले,
स्वराज्याची दुसरी राजधानी, धर्मपीठ, बलिदान पीठ, प्रेरणापीठ, श्रीक्षेत्र वढू बुद्रुक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक या तीन किलोमीटरच्या अंतराचे नुकतेच नूतनी करण करण्यात आले असून सिमेंटचा रस्ता बनवण्यात आला आहे,
अनेक वर्षांची रस्त्याची अडचण दूर झाली परंतु बेशिस्त तरुणाई मुळे अतिवेग, र्याश ड्रायव्हिंग दुचाकी तसेच चार चाकी व इतर वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते, रस्त्याच्या आजूबाजूची दाट रहदारी, याचा सविस्तर वृत्तांत भरारी न्यूजने शासनापर्यंत तसेच समाजापर्यंत पोहोचवला, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला खडबडून जाग आली परिणामतः परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर संबंधित रस्त्यावर गतिरोधक टाकण्यात आले, त्यामुळे आता वाहनांचा वेग कमी झाला असून ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे, भरारी न्यूजच्या या कामगिरी बद्दल समाजातून कौतुक व्यक्त करण्यात आले,