सुनील भंडारे पाटील
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर प्रभावी अशी कारवाई करण्यासाठी नियुक्त केलेले जिल्हास्तरीय भरारी पथक राजकीय हस्तक्षेपामुळे रद्द करण्यात आले, तरी रद्द केलेले भरारी पथक त्वरित नियुक्त करावे, तसेच भरारी पथक का रद्द केले गेले तसेच आर्थिक व्यवहार झाला आहे त्या संदर्भात अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांची चौकशी करण्यात यावी अन्यथा, जिल्हाधिकारी कार्यालयात, ९ जुलै रोजी सकाळी ११. ३० वाजल्यापासून संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
चंद्रशेखर घाडगे (जिल्हाध्यक्ष, सांभाजी ब्रिगेड पुणे) असा इशारा दिला आहे,
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर प्रभावी अशी कारवाई करण्यासाठी नियुक्त केलेले जिल्हास्तरीय भरारी पथक राजकीय हस्तक्षेपामुळे रद्द करण्यात आले, अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी भरारी पथक रद्द केल्याचे पत्र काढले आहे, पण भरारी पथक जे कारण देऊन रद्द केले आहे ते सर्वसामान्य जनतेला न पटणारे आहे, शासकीय वाहन नाही, पुरेसा पोलीस बंदोबस्त नाही हे कारण देऊन अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी भरारी पथक रद्द केले आहे, पण हे भरारी पथक रद्द करण्यामागे राजकीय हस्तक्षेप आणि आर्थिक देवाणघेवाण हे कारण आहे,
त्याची आपण सखोल चौकशी करावी, विना परवाना दगड खाणी चालवल्या जात आहेत, परवानगीच्या कितीतरी पट उत्खनन केले जात आहे, आता परेंत हजारो ब्रास अवैध उत्खनन करून राज्यसरकारचा करोडो रुपये महसूल बुडवला आहे, त्याचीही सखोल चौकशी करण्यात यावी आणि सरकारचा महसूल बुडवणाऱ्यावर कारवाई करून सरकारचा बुडवलेला म्हसूल दंड लावून वसुल करण्यात यावा.अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी रद्द केलेले भरारी पथक त्वरित कार्यान्वित करावे,
संभाजी ब्रिगेडच्या वतीने खालील मागण्या करण्यात आल्या आहेत, त्याचा त्वरित निर्णय घेऊन खालील मागण्या मान्य कराव्यात,
१) वाघोली, लोणीकंद, भावडी, हद्दीतील दगड खाणी उद्योजकांकडून परवानगी मधील अनेक नियमांचे उल्लंघन करून दगड खाणी चालवल्या जात आहेत, त्यांनी आतापरेंत सरकारचा महसूल बुडवला आहे, त्यावर काय कारवाई होणार आहे,
२) विनापरवाना दगड खाणी चालवल्या जात आहेत, परवानगीच्या कितीतरी पट अवैध्य उत्खनन, गौण खनिज वाहतूक यामुळे आमची सर्वसामान्य जनता त्रस्त झाले आहे, व सरकारचा शेकडो कोटींचा महसूल बुडवला आहे, त्याच्यावर काय कारवाई करणार आहात त्याचंही आम्हाला ठाम उत्तर द्यावं,
३) दगड खाणीतून उडणाऱ्या धुळीचा आजूबाजूच्या गावांना ,शेतीला होणारा त्रास, या सर्व गोष्टींचा विचार करता, महसूल गौण खनिज खात्याकडून आतापर्यंतच्या कालावधीत कारवाया का झाले नाहीत? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे, त्याचंही आपण आम्हाला उत्तर द्यावं
४)दगड खाणींचे ड्रोन द्वारे सर्वेक्षण करण्यात आले होते, या सर्वेक्षणाचा रिपोर्ट तयार झाला असून यावर अप्पर जिल्हाधिकारी पुणे अजय मोरे यांची काय कारवाई होईल. हे सांगावं
५) कर्तव्यदक्ष धडाडीच्या तहसीलदार देवरे यांच्या बदलीसाठी पडद्यामागून रात्री अपरात्री दगडखान उद्योजकांच्या बैठक,मंत्रालयात तसेच बाहेर त्या कारणासाठी राजकीय हस्तक्षेप यामुळे सर्वसामान्य जनते मध्ये नाराजी आहे त्याचाही आपण विचार करावा,
६) काही खाणींना बेकायदेशीर विज पुरवठा होतोय, त्याची चौकशी करावी,
७)पुणे जिल्ह्यातील दगड खान उद्योगांमध्ये गेल्या वीस वर्षांमध्ये एवढी धडाडीची कारवाई कधीच झाली नव्हती, हे सत्य आहे त्याचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा,
८)रद्द करण्यात आलेले भरारी पथक पुन्हा कार्यान्वित करावे,
९) राजकीय दबावापोटी परिपत्रकासारखा मोठा निर्णय घेतला यामध्ये आर्थिक हितसंबंध बाबत अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांची चौकशी व्हावी,
१०) परवानगीच्या कितीतरी पट उत्खनन केले जात आहे, आतापरेंत हजारो ब्रास अवैध उत्खनन करून राज्यसरकारचे कोरोडो रुपये महसूल बुडवला आहे, त्याचीही सखोल चौकशी करण्यात यावी आणि सरकारचा महसूल बुडवणाऱ्यावर कारवाई करून सरकारचा बुडवलेला म्हसूल दंड लावून वसुल करण्यात यावा.
वरील मागण्या त्वरित मान्य कराव्यात तसेच रद्द केलेले भरारी पथक त्वरित कार्यान्वित करावे,
अन्यथा ९ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेड स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल,
संघर्ष हा संभाजी ब्रिगेडच्या रक्तातच आहे, जो परेंत अवैध रद्द केलेले भरारी पथक पुन्हा कार्यान्वित होत नाही तोपरेंत आम्ही आमचा लढा थांबवणार नाही. असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिला,
यासंदर्भात संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले, यावेळी
संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, जिल्हा सचिव निलेश ढगे, जिल्हा उपाध्यक्ष निलेश कांबळे, हवेली तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, शिरूर तालुकाध्यक्ष अक्षय गायकवाड, दिनकर केदारी, आदम तांबोळी, संतोष सूर्यवंशी,अशोक फाजगे, सोनु शेलार, उपस्थित होते.