सुनील भंडारे पाटील
लोणीकंद परिसरातील प्रसिद्ध उद्योगपती तथा श्री रामचंद्र शिक्षण संस्थेचे खजिनदार दत्तात्रय रामचंद्र भूमकर(वय-७५) यांचे सोमवारी,१५ जुलै रोजी,सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान दीर्घ आजाराने लोणीकंद येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले.त्यांच्या जाण्याने लोणीकंद परिसरात शोककळा पसरली आहे.
कै.दत्तात्रय(आण्णा) रामचंद्र भूमकर यांच्या मागे तीन सख्खे भाऊ असून एक बहीण,दोन मुले,दोन मुली,नातू,नातवंडे असा मोठा भूमकर परिवार आहे.उद्योजक पांडुरंग दत्तात्रय भूमकर,उद्योजक स्वप्नील दत्तात्रय भूमकर यांचे ते वडील आहेत.ते भूमकर परिवारातील जेष्ठ मार्गदर्शक व आधारवड म्हणून त्यांची ओळख आहे.
वाहन मालक ते प्रसिद्ध जेष्ठ उद्योगपती व समाजसेवक असा त्यांचा प्रवास राहिला.खान उद्योग व्यवसाय व श्री रामचंद्र शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी लोणीकंद सह पूर्व हवेली तालुक्यात अनेक लोकउपयोगी समाजसेवेची कामे केली आहे.लोणीकंद परिसरात धार्मिक,सामाजिक, शिक्षनिक,आदी अनेक क्षेत्रात त्यांनी समाजाला मदतीचा हात पुढे करीत समाजाच्या अडी,अडचणी,सोडवून आदर्श समाजसेवेची कामे केली असल्याने एक आदर्श समाजसेवक म्हणून त्यांची परिसरात ओळख होती.