शिवसह्याद्री चॅरिटेबल फाऊंडेशन पुणे यांचे माध्यमातून पुणे येथील पत्रकार भवन येथे शिवसह्याद्री पुरस्कार आणि सन्मानपत्र देऊन माहिती सेवा समितीचे संस्थापकीय अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांना गौरविण्यात आले.
हा सन्मान राजेंद्र कोंढरे, भाऊसाहेब जाधव (सर) प्राचार्य -मराठवाडा महाविद्यालय, सुरेश कोते सर -सर्वेसर्वा लिज्जत पापड ऊद्योग समुह यांच्या हस्ते देण्यात आला तसेच याठिकाणी शेकडो गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली त्याठिकाणी वारघडे यांना प्रमुख पाहुण्याचा मान मिळाला वारघडे यांना मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली याप्रसंगी कोंढरे सरांचे खुप खुप आभार मानण्यात आले.तसेच हा पुरस्कार आणि सन्मानपत्र आमचे सहकारी मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष.गुलाबराव गायकवाड यांनी पुरस्कारा मिळवण्यासाठी प्रयत्न केले,वनराईत काम करणारे सर्व वृक्ष मित्र ,बकोरी ग्रामस्थ यांचे मी खूप खूप आभारी आहे. असे वारघडे यांनी सांगितले,