शासनाच्या आदेशानुसार 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे, गट विकास अधिकारी महेश डोके, म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. आमदार सूर्यकांत पलांडे,भाजपा उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष शरदभाऊ बुट्टे पाटील, पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग यांच्या मार्गदर्शना खाली आणि निमगाव म्हाळुंगी चे विद्यमान सरपंच यांच्या नेतृत्वा खाली निमगाव म्हाळुंगी गावा मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला
यामध्ये श्रीमती बबईताई टाकळकर प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेमध्ये तिरंगा मेला आणि तिरंगा प्रतिज्ञा यांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका लताबाई चव्हाण,आणि मंदाकिनी काळकुटे,तसेच बापूसाहेब लोंढे, झेंडू पवार सर, फैज जमादार,बाबुराव चौधरी यांच्या शुभ हस्ते सदर कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आले.
मैदानावर विद्यार्थी यांच्या माद्यमातून तिरंगी पताका लावून एक आनंद उत्सव साजरा करत होते. सदर कार्यक्रम प्रसंगी निमगाव म्हाळुंगी गावचे प्रथम नागरिक गावचे चे सरपंच श्री बापूसाहेब काळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा मेला, संविधान वाचन,राष्ट्रगीत अशा विविध देशभक्तीपर कार्यक्रमांनी हर घर अभियान महोत्सव या कार्यक्रम दरम्यान साजरा करण्यात आल्याचे निमगाव म्हाळुंगी सरपंच श्री बापूसाहेब काळे यांनी सांगितले
यावेळी मोठया प्रमाणावर शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच गावातील ग्रामस्थ मोठया प्रमाणावर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेच्या मुख्याध्यापक लताबाई चव्हाण यांनी केले.तर सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक झेंडू पवार सर यांनी केले असून निमगाव म्हाळुंगी गावामध्ये स्वतंत्र्याचाअमृत महोत्सवामध्ये साजरा करण्यासाठी श्रीमती बबइताई टाकळकर प्राथमिक व माध्यमिक शाळेने तसेच संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले त्याबद्दल सरपंच बापूसाहेब काळे यांनी सर्वांचे आभार मानले,