सुनील भंडारे पाटील
गुन्हे शाखा युनिट 6 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे वाघोली परिसरात गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना बकोरी फाटा येथे एक इसम हिरो होंडा स्प्लेंडर प्लस गाडीला चुकीचा नंबर लावुन जात असताना दिसला. पोलीस अंमलदार सचिन पवार यांना त्याचा संशय आल्याने त्यास थांबवुन सदर गाडीबाबत चौकशी केली असता,
त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सदर गाडीबाबत अभिलेख तपासता लोणीकंद पो.स्टे. गु.र.नं. 19/2022 भा. द. वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद असलेबाबत समजले. त्यास गाडीसह ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव गोटूराम शिवाजी बरकडे, वय 32 वर्षे, रा. बापू बरकडे यांचे शेजारी, जि.प. शाळेजवळ, कोळपेवाडी, पेरणे, ता. हवेली, जि.पुणे असे सांगितले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता दिनांक १०/०१/२०२२ रोजी बकोरी फाटा वाघोली येथून सदरची दुचाकी चोरलेबाबत कबूल केले.
त्याचेकडून गुन्ह्यातील २५,००० रु किमतीची एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्यास पुढील तपासकामी लोणीकंद पोलीस स्टेशन यांचे स्वाधीन करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे, अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे - २ सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट - ६ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, शेखर काटे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.