राज्य सरकारने शेतीच्या पाणी पट्टीत अचानकपणे दहापट वाढ केल्याने व दि.29 मार्च 2022 रोजीचे ठोक जल प्रशुल्क निर्धारण आदेश निर्देशित केल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. राज्याच्या जलसंपदा विभागाने शेतीसाठी लागणाऱ्या पाणीपट्टीचे दर चक्क दहापट केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे एका झटक्यात दहापट झालेली ही दरवाढ बागायती शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी आहे.
या विषया संदर्भात हवेली तालुक्यातील नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी या विषयाला विरोध करण्यासाठी वाडेबोल्हाई येथे तातडीची बैठक घेऊन कृतिसमिती स्थापन केली असून
कृतिसमितीच्या बैठकीत वॉटर मीटरही नको आणि पाणीपट्टी नको व पाणी पट्टीमधून मुळा मुठा नदी काठची गावे मुक्त करा असे निवेदन सिंचन विभागात देण्यात आले आहे
याबाबत अद्याप कुठलीच कार्यवाही न झाल्याने जलसंपदा मंत्री व पालकमंत्री यांनाही निवेदन देऊनही अद्याप कुठलाच निर्णय अथवा संबंधित खात्याने पत्रव्यवहार केला नसल्याने हिंगणगाव - खामगाव टेक पासून मांजरी बु.||खु.|| पर्यंतच्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन फार मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा
बापूसाहेब पठारे (मा. आमदार) अध्यक्ष कृतीसमिती व अंकुश कोतवाल सचिव व कृती समितीचे सर्व पदाधिकारी यांनी सरकारला दिला आहे.