सुनील भंडारे पाटील
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीच्या अवचित्याने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान, मुंडवा यांच्या वतीने सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आदर्श समाज सेवक पुरस्कार संतुलन संस्थेचे संस्थापक एडवोकेट बी एम रेगे व एडवोकेट पल्लवी रेगे यांना लोणकर माध्यमिक विद्यालय मुंडवा येथे झालेल्या कार्यक्रमात बहाल करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार चेतन दादा तुपे, प्रशांत दादा जगताप, बंडू तात्या गायकवाड, तुळजाभवानी प्रतिष्ठानचे शक्ति प्रधान या सर्वांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी झोपडपट्टी बचाव आंदोलनाचे भगवानराव वैराट, शिवलाल दादा जाधव, निलेश भाऊ वाघमारे, सामाजिक विचारवंत सचिन बगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या पुरस्काराला उत्तर देताना एडवोकेट बी एम रेगे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे प्रेरणादायी विचार मांडण्याबरोबर पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित, कष्टकरी व श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे या विचारावर जोर देत शेतकरी, कष्टकरी व अंगमेहनती नसतेतर पृथ्वी टिकली नसती असे ठाम मत मांडले. स्वातंत्र्यानंतर सुद्धा अनेक घटक उपेक्षित असून त्यांना स्वातंत्र्याचा लाभ मिळाला नाही. अण्णाभाऊंच्या "ये आजादी छुटी है देश की जनता भुकी है" हे क्रांतिकारक विचार खास शैलीत मांडले. यावेळी विद्यार्थ्यांसह सर्व उपस्थित त्यांनी मोठी दाद दिली. आजही करोडो गोर गरिब कुंडुंबांना शासन मोफत धान्यदेत, देशात असंख्य कुंटुंबांच्या नावे नाघर- नाशेती. यांच्या हक्काचा लढा आज ही चालू आहे व चालू राहिल.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा लोणकर विद्यालयाच्या प्राचार्या स्नेहल जाधव होत्या. कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान मुंढवा यांनी केले. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरासह विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.