साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी येथे आयोजित कार्यक्रमात लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.
यावेळी महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक सचिनकुमार मठपती, जिल्हा व्यवस्थापक शिवाजी मांजरे, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विशाल लोंढे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर आदी परीक्षेत उत्तीर्ण होऊन गुणांकन मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्सहानपर १ लाख २५ हजार रुपयांचे शिष्यवत्तीचे विदयार्थ्यांना धनादेश तसेच बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणाचे एकूण १६ लाख रुपयांचे लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरित करण्यात आले.