आळंदी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर
काळूस (तालुका खेड) गावातील बेकायदा पुनर्वसन बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या आता सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन मंजुरी साठी मंत्रालयात निर्णायक वळणावर आल्या आहेत. सरकारला हा निर्णय घेण्यासाठी जाग यावी आणि गांभीर्याने या प्रश्नांकडे सरकारने लक्ष देण्याचे मागणी साठी काळूस या ठिकाणी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती सुभाष पवळे यांनी दिली.
या उपोषणाची अनेक सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते आणि जाणकार शेतकरी यांनी उपोषण कर्त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी जाहीर पाठिंबा दिला असल्याची माहिती शेतकरी नेते गजानन गाडेकर यांनी दिली. काळूस येथे विविध मागण्यांसाठी गेल्या १२ दिवसापासून उपोषण केला जात असून उपोषण कर्त्यांची नियमित तपासणी व संदर्भ आरोग्य सेवा सल्ला उपचार दिले जात आहेत. यासाठी तपासणी देखील केली जात आहे. गेल्या १२ दिवसां पासून उपोषण काळुस येथे सुरू आहे. उपोषण कर्ते यांची तब्येत स्थिर आहे. दक्षता घेतली जात आहे.
या वेळी खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास माने यांचे मार्गदर्शनात वैद्यकीय अधिकारी पथकाने आरोग्य तपासणी उपचारासाठी कळस येथे भेट दिली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डाॅ रिषव डागा, समुदाय आरोग्य अधिकारी मेघा वानखेडे, आरोग्य सेवक सुहास टकले आदींचे वैद्यकिय पथक व रुग्ण वाहीका २४ तास उपोषण स्थळी तैनात करण्यात आले आहे. पथकाचे माध्यमातून दररोज दिवसातुन ३ -४ वेळा सर्व तपासण्या उपोषण कर्त्यांचे घेतल्या जात आहेत. या तपासण्यात संदर्भ सेवा व उपचार दिले जात आहेत.