सुनील भंडारे पाटील
पेरणे (तालुका हवेली) येथे 30/08/2024 रोजी रात्रीचे सुमारास गावामध्ये बिबटयाने दोन गाई यांच्यावर हल्ला केला त्यामध्ये एका गाईचा मृत्यू झाला असून दुसऱ्या गाईवर हल्ला करत असताना मालकाने आरडाओरडा केल्याने त्या गाईला बिबट्या सोडून पळाला,
मिळालेल्या माहितीनुसार भरत ज्ञानोबा वाळके यांनी शेतामध्ये बांधलेल्या गाईवर हल्ला बिबट्याने जबर हल्ला करून जागीच ठार केले. तसेच माऊलाई चौक, येथे वायरमन बाळासाहेब गायकवाड यांचे गाई वर बिबटया हल्ला करीत असताना त्यांनी त्यास प्रतिकार केला असता बिबटया पळून गेला, गाईला जखम झाली असून त्यावर उपचार करण्यात आला आहे. सदर घटनेची माहिती वन विभागाचे शिवले व पेरणे गावचे तलाठी शितोळे यांना पेरणे ग्रामपंचायत सदस्य माधुरी नवनाथ वाळके व गोरक्ष वाळके, संचालक राजकुमार वाळके यांनी माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे. त्याचप्रमाणे मृत गाईचा व जखमी गाईचा पंचनामा करण्यात आला वन विभागास बिबट्याचा शोध घेणेबाबत विनंती करण्यात आली आहे.
संबंधित घटनेमुळे पेरणे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून लोकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे, बिबट्याची भीती मनात बसल्यामुळे अंधारामध्ये बिबट्या येतो की काय अशी शंका मनात येत आहे,सर्व नागरिकांना विनंती आहे की सर्वांनी दक्षता घ्यावी असे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच ग्रामस्थांनी केली आहे, संबंधित बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत,