इंदापूर प्रतिनिधी गौतम पिसे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे पुणे शहर अध्यक्ष जयदेव आहिलू इसवे यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ समाजसेवक आदरणीय जयाताई देशपांडे यांच्या सहकार्याने व शुभ हस्ते मोरे वस्ती पद्मावती येथील अंगणवाडी मधील लहानग्या बाळ गोपाळांना रंग पेटी, चित्रकला पुस्तक, खेळणी वाटप करण्यात आली,
या वेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता त्याच बरोबर मुलांना वर्गात फरशीवर बसावं लागत होते त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे अपाय टाळण्यासाठी मुलांना बसण्याची व्यवस्था म्हणून सतरंजी देण्यात आली, या प्रसंगी बोलताना जया (काकू) म्हणाल्या मुलांचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेतला पाहिजे तसेच मुलांना शालेय शिक्षण घेत असताना पुर्णतः सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले,
शहर अध्यक्ष जयदेव इसवे यांनी मा जयताईंचे आभार व्यक्त करताना त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली व मुलांच्या पालकांना मुलांचे काळजीपूर्वक पोषण करण्या बाबत माहिती दिली तसेच लहान मुलांना शाळेत अन्याय अत्याच्याराला बळी पडावं लागते आहे त्या पासून बचाव कसा करावा,पालकांनी कोणत्या प्रकारची दक्षता घ्यावी यासाठी मार्गदर्शन केले.
बअंगणवाडी सेविका वंदना वाघमारे मॅडम यांनी जयताईंचा सत्कार करून आभार मानले
कार्यक्रम प्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष रघुनाथ भिसे, स्वरूप इसवे, अक्षरा लोखंडे, स्मिता इसवे, सरचिटणीस श्रीमती पूनम सोनावणे, निरीक्षक डॉ गौतम पिसे, सचिव मीनाक्षी कांबळे, सारिका येडे, लाखन ताई, होडे मॅडम, शुभांगी मोगम , सचिव अशोक नाळे, राजू गुडेकर, शालिनी चव्हाण , लीलाताई वाळुंज, रणसिंग मॅडम, पवार मॅडम, मोहिते मॅडम तसेच अनेक पालकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन स्वरूप जयदेव इसवे यांनी केले होते,