जांबुत प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरडेवाडी शाळेतील इयत्ता ५ वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा शहरी विभागातून मार्गदर्शक शिक्षिका प्रमिला संजयकुमार जोरी यांचा एक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत व ११ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आल्याबद्दल पालक व ग्रामस्थांच्या वतीने एक लाख वीस हजार रुपये किमतीची बजाज चेतक इलेक्ट्रिक दुचाकी, मानाची पैठणी, सन्मान चिन्ह, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन पुरी यांच्या तर्फे रुपये ६३०० व संगिता बबन वळसे मार्गदर्शक शिक्षिका यांचा एक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्याबद्दल त्यांना मानाची पैठणी, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक शैलेंद्र चिखले यांनी दिली.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ५ वी ) शहरी विभागामध्ये महाराष्ट्र राज्यात तिसरा क्रमांक, पुणे जिल्ह्यात दुसरा क्रमांक आलेली विद्यार्थिनी सिद्धी संदीप मांझिरे, जिल्हा गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी स्वरा सचिन मोरडे, रुद्र विशाल मोरडे,आशिष संभाजी निघोट, धनश्री हनुमंत मोरडे,वैभवी जितेंद्र काजळे, उत्कर्ष गौरव राजगुरू,अभिमन्यू अविनाश बोऱ्हाडे,श्रावणी संतोष मोरडे, अर्णवी नितीन निघोट, यश मदनलाल मोदी, प्रिया सचिन मोरडे ,कादंबरी संदीप भागवत या तेरा विद्यार्थ्यांना . मारुती धोंडीबा मोरडे अण्णा गुरुजी गुणवंत विद्यार्थी प्रोत्साहनपर बक्षीस योजनेतून सन्मानचिन्ह व २००० रुपये किमतीचे शालोपयोगी साहित्य शारदा प्रबोधिनी संस्थापक अध्यक्ष ह. भ. प. पांडुरंग महाराज येवले यांच्या शुभहस्ते देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ग्रामपंचायत सदस्य विशाल मोरडे यांनी भूषविले. कार्यक्रम प्रसंगी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व पालक यांची मनोगते झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक शैलेंद्र चिखले यांनी केले.
याप्रसंगी शिरूर पंचायत समिती सदस्य वासुदेव अण्णा जोरी म्हणाले की, सकाळी आठ ते सायंकाळी आठ या वेळेत शिष्यवृत्तीचे जादा तास घेऊन शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, शिक्षक आजारी असल्यावर पालक स्वतः मार्गदर्शन करतात, पालक उत्तम प्रकारे मुलांच्या नाष्टा व आहाराची व्यवस्था पाहतात, हे मी पहिल्यांदाच अनुभवत आहे. मोरडेवाडीच्या ग्रामस्थांचे शाळा विकासासाठी मोठे योगदान आहे. शिष्यवृत्तीत आलेले हे विद्यार्थी मोठेपणी चांगले उच्च दर्जाचे अधिकारी बनतील यात शंका नाही.
कार्यक्रम प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी गजानन पुरी, केंद्रप्रमुख बाळासाहेब आडके, कमलजादेवी माता सेवा मंडळ अध्यक्ष दत्तात्रय मोरडे, उपाध्यक्ष विठ्ठल मोरडे, बबन मोरडे, टी एस ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन भगवान बोऱ्हाडे, रोटरी चे अध्यक्ष प्रशांत बागल, प्रगतशिल शेतकरी शिवाजी बदर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कांताराम मोरडे, उपाध्यक्ष नारायण निघोट, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव मोरडे, ज्योती निघोट, राजू मोरडे, वरद इंडस्ट्रीज चे संस्थापक संदीप मोरडे, नवनाथ मोरडे, केंद्रप्रमुख शैला फल्ले, संजयकुमार जोरी मुख्याध्यापक महर्षी शिंदे हायस्कूल आंबळे शिरूर, अश्विनी धनेश मोरडे, कमल मोरडे, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय घिसे व पंकजा हगवणे यांनी केले. कार्यक्रमाची व्यवस्था कान्होबा डोंगरे, महेश बढे,महानंदा मगरे, पुष्पा कारले, मंगलादेवी पवार, कविता वळसे, रूपाली होनराव, रेश्मा ढोबळे, ममता त्रिवेदी यांनी पाहिली.