पुणे जिल्हा प्रतिनिधी
बारामती हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड बारामती येथे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या पाच लाख रुपये नि:शुल्क उपचाराचे तीन तेरा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या बोर्डची लपवाछपवी सर्वसामान्य रुग्ण परेशान दाद मागावी तरी कोणाकडे?
भारत सरकारने मोठा गाजावाजा करून आयुष्मान भारत योजना २३ सप्टेंबर २०१८ रोजी सुरू केली परंतु या योजनेमध्ये समाविष्ट आसनारी हॉस्पिटल्स सर्व सामान्य गोरगरीब जनतेला ५ लाख रुपयांपर्यंतचे निःशुल्क उपचार देत नाहीत, केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून सर्व मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारने जाहिरात बाजी करून आयुष्मान भारत योजना लॉन्च केली परंतू ग्राऊंड लेव्हलला ह्या योजनेचे तिन तेरा वाजलेले दिसून येत आहेत.
याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे बारामती हॉस्पिटल्स प्रा. लि. बारामती येथे आयुष्मान भारत योजनेचा बोर्ड हा झाकून ठेवला जात आहे व येथे उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब जनतेला आयुष्मान भारत योजनेमधून उपचार नाकारला जात आहे तसेच आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेत १२०९ उपचार व महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९९६ उपचार निःशुल्क आहेत त्यामधून फक्त केमोथेरपी, व ॲन्जीओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया इत्यादी उपचार निःशुल्क केला जात आहे परंतू त्याला सुद्धा गरीब रुग्णांकडून दहा हजार रुपयांपासून ते साठ हजार रुपयांपर्यंत घेतले जात आहेत.
तसेच राज्य सरकारने या योजनांसाठी आरोग्य मित्र प्रत्येक समाविष्ट योजनेंमधील हॉस्पिटल्स मध्ये नियुक्त केले आहेत परंतू ते सुद्धा रुग्णांना व्यवस्थित योजनेविषयी माहिती देत नाहीत कारण ते पुर्णता हॉस्पिटल्स मॅनेजमेंन्ट चे ऐकतात त्यामुळे सर्व सामान्य रुग्णांना सदरील योजनांचा काहीच फायदा होत नाही तरी शासनाने या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे.
तसेच शासनाने या सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालून अशा हॉस्पिटल्स वरती कायदेशीर कारवाई करून अशी निःशुल्क सेवा न देणारी हॉस्पिटल्स ब्लॅक लिस्ट करावीत जेणेकरून सर्व सामान्य गोरगरीब जनतेची होणारी पैशांची लूट थांबेल, वरील प्रमाणे मागणी आता सर्व सामान्य गोरगरीब रुग्णांकडून होऊ लागली आहे.