पुणे सोलापुर महामार्गावरील उरुळी कांचन येथे वाहतूक कोंडी नित्याची
पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथे वाहतूक कोंडीचे पोलिसांकडून नियोजन होत नसल्याने वाहतूक कोंडी नित्याची बाब ठरत आहे. सुट्टीचा दिवस असो किंवा इतर दिवस उरुळी कांचन येथे वाहतुक कोंडी नित्याचीच बाब होत आहे. आज सकाळ पासुनच उरुळी कांचन येथील बस स्टॉप चौक व शिंदवणे चौक येथे सकाळ पासुनच वाहतूक कोंडी झाली होती. होणाऱ्या वाहतूक कोंडीतून शाळेचे विद्यार्थी वृद्ध नागरिक यांना पुणे सोलापूर महामार्ग ओलांडताना अनेक आडचणींना सामोरे जावा लागत असुन मोठी कसरत करावी लागत आहे. त्या ठिकाणी पोलीस नेमणे गरजेचे आहे. पोलीस माञ वाहतुक कोंडी झाल्यावरच त्या ठिकाणी तेवढ्यापुरते दिसतात.असे विजय कानकाटे यांनी सांगितले.