हवेली प्रतिनिधी
वाघोली (तालुका हवेली) येथील वाघेश्वरनगर या दगडखाण कष्टकरी कामगार वस्तीमध्ये बेकायदेशीर दारूधंदे, मटका, जुगार व गांज्या व्यवसाय अचानक फोफावल्याने वस्तीतील अल्पवयीन बालकांमध्ये वाढती गुन्हेगारी व मुली आणि महिलांची बदनामी जाणिवपूर्वक मोठ्या प्रमाणत केली जात आहे.
यां वस्तीचे नामकरणापासून ते त्यांना मुलभूत हक्क मिळवून देण्यासाठी अहोरात्र झगडनाऱ्या संतुलन संस्थेचे संस्थापक अँड पल्लवी रेगे व अँड बी एम रेगे सोबत वाघेश्वरनगर येथील सुज्ञ नागरीक व युवकांनी लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ट पोलीस निरिक्षक पंडीत रेजितवाड यांची प्रत्यक्ष भेट वाघेश्वरनगर येथील बेकायदा दारू धंदे, जुगारअड्डे, गांजा बंद करा या बाबत चर्चा दरम्यान लोणीकंद पोलिस विभागाणे जबरदस्त कार्यवाही करण्याचे आश्वासन वरिष्ट पोलिस निरिक्षकांनी शिष्ट मंडळाला दिले आहे.
दूरध्वनी व्दारे या समस्या बाबत खासदार अमूल कोल्हे व आमदार अशोक बापू पवार यांनीही पंडित साहबांशी संपर्क साधून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
यावेळी अँड बी.एम रेगे, अँड पल्लवी रेगे, रामभाऊ दाभाडे, अंबादास साळुंखे, शिवाजी मोहिते, महादेव मंजुळे, बळीराम पवार, लक्ष्मण पेटकर, साधू येताळ, विजू कांबळे, नितीन पेटकर, सुधिर पेटकर, सविता मंजुळे, सुमन पेटकर, सुनिता पेटकर, संगिता पेटकर, विटाबाई पेटकर, अश्विनी लष्करे आदी मोठ्या संख्येने कष्टकरी महिला व कामगार लोणिकंद पोलिस स्टेशनला उपस्थित होते.