आळंदी प्रतिनिधि अर्जुन मेदनकर
आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत या वर्षी श्रावणातील नागपंचमी सण उत्साहात साजरा करण्यात आला. नेहमी प्रमाणे भाविकांच्या गर्दीने माऊली मंदिर परिसर गजबजून गेला होत. नागपंचमी दिनी श्रींचे दर्शनास महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
नागपंचमी निमित्त आळंदीतील मानकरी कुटुंबातील महिलांनी परंपरागत पद्धतीने उत्साहात नागदेवतेची पूजा करून नागपंचमी सण साजरा केला. या प्रसंगी नागदेवताची आळंदी नगरपरिषद चौकात पूजा करण्यात आली. त्यानंतर सनई वाद्यवादनात श्री राम मंदिर, श्री विष्णू मंदिर या ठिकाणी जात श्री नागदेवता श्रींचे आगमन माऊली मंदिरात झाले. प्रथा परंपरांचे पालन करीत पूजा नागदेवतेची पूजा पुष्पा चिताळकर पाटील, अंजना कुऱ्हाडे पाटील, रेखा कुऱ्हाडे पाटील, माजी नगरसेविका ज्योती चिताळकर पाटील, सृष्टी घुंडरे पाटील, लक्ष्मी कुऱ्हाडे पाटील, परिणिती कुऱ्हाडे पाटील यांचे हस्ते झाली. नागपंचमी आळंदी पंचक्रोशीत देखील महिला भाविकांनी परंपरेने उत्साहात साजरी केली. आळंदी पंचक्रोशीत नागनरसोबा विधीवत पूजा परंपरेने झाली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने नाग देवतेची सनई चौघड्यात मिरवणूक काढण्यात आली. आळंदी नगरपरिषद चौक येथील नागदेवतेची पूजा करण्यात आली. यावेळी नाग देवताची पुजा, पुरण पोळी महानैवेद्य वाढविण्यात आला. या प्रसंगी दर्शनास भाविकांनी गर्दी केली होती. मंदिरात फुगड्यांच्या खेळ रंगला. नागदेवतेची पूजा करण्यास भाविकांनी गर्दी केली. व्यवस्थापक माऊली वीर, तुकाराम माने, सुरक्षा रक्षक, सेवक, पुजारी यांनी भाविकांना कमी वेळेत दर्शन देण्याची सुलभ व्यवस्था केली.