यवत प्रतिनिधी नवनाथ वेताळ
हैद्राबाद वरून पुण्याला येत असलेल्या धावत्या बसने पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती पेट घेतला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत बसचे मोठे नुकसान झाले आहे. या मध्ये प्रवाशांच्या बॅगा तसेच प्रवाशांचे सामान यात जळून खाक झाली . सदर बसमध्ये 17 प्रवासी प्रवास करीत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सदरची बस हैदराबाद वरून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमध्ये एकूण 17 प्रवासी प्रवास करीत होते. ही बस कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत आली असता गाडीचे टायर फुटले आणि गाडीने अचानक पेट घेतला. आगीत गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस आणि पुणे महानगर पालिकेचे अग्निशमन दल व जवान घटनास्थळी हजर झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून यावेळी महामार्ग दोन्ही बाजुंनी बंद ठेवण्यात आला होता. महामार्गांवर मोठया प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेले होते.