सुनील भंडारे पाटील
लोणीकंद भावडी (तालुका हवेली) येथील प्रचंड अशा खडी वाहतूक डंपर मुळे पुणे नगर महामार्गावर प्रवाशांना तसेच नागरिकांना प्रचंड अशा धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने या व्यवसायाला वरद हस्त असणाऱ्या लोकनेत्यांचा बदला घेण्याची वेळ आता आली आहे, अशा व्यक्तीला आता जागा दाखवून देऊ अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये रंग धरू लागली आहे,
गेल्या वीस वर्षांपासून संबंधित ठिकाणी तसेच आसपासच्या परिसरामध्ये पूर्णपणे पर्यावरण विस्कळीत झाले असून दिवसा ढवळ्या अवैध रित्या चाललेला हा व्यवसाय व यापासून पर्यावरण तसेच नागरिकांना होणारा त्रास विचार करण्याच्या पलीकडचा आहे, काही मूठभर लोकांच्या श्रीमंतीसाठी संपूर्ण समाज वेठीस धरला जात आहे,
खडी क्रशरमुळे आसपासच गावांचे पर्यावरण दूषित झाले आहे, लोकांना दम्याचा त्रास होऊ लागला आहे, खडी वाहतूक डंपर मुळे अपघातात अनेक जीव गेलेत, पुणे नगर महामार्ग वर डंपर चाका खालील, व डंपर मधील उडत असलेल्या धुळीमुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, धुळीने डोळे गच्च होत आहेत, रॉयल्टि पेक्षा लाखो पट उत्खनन करून सरकारची फसवणूक यावर वरद हस्त असणाऱ्यांचा आता येत्या विधानसभेत हिशोब चुकता होणार अशी चर्चा आता नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे,