पोलीस पाटील गावातील प्रतिष्ठेचे पद आहे. खेडेगावात पोलीस पाटील म्हणजेच महत्त्वाचे घटक आहे,गावातील कोणत्याही कारणामुळे जसे की खून,दरोडा,मृत्यू किंवा कायद्याचे उल्लंघन करत असलेल्या बाबींवर कायदेशीर प्राथमिक माहिती घेऊन पोलीस स्टेशनला कळविण्याचे महत्वाचे काम पोलीस पाटलांचे असते. पोलीस प्रशासन आणि गाव पातळीवरील नागरिक यांच्यातील पोलीस पाटील महत्वाचा दुवा असतो,
तसेच याच प्रमाने पोलीस पाटील आपली उल्लेखनिय कामगिरी करत आहेत आणि गाव पातळीवरील शांतता प्रस्थापित करण्याचे महत्वाचे काम करत आहे. पोलीस पाटीलांना आपल्या कार्यात उत्साह आणि प्रेरणा आणि अधिक अधिक पारदर्शक काम करण्यची उमेद निर्माण करण्यासाठी आणि केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बजावल्या बाबत पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व तहसीलदार साहेब यांस कडून त्यांना उत्कृष्ट कामगिरी बाबत प्रशंसा पत्र देतात.
अशीच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सौ.अश्विनी दत्तात्रय सोनवणे ( पोलीस पाटील कासुर्डी गाव ) यांना आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत प्रशंसा पत्र दौंड तालुक्याचे तहसीलदार साहेब व यवत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांस कडून आज गौरवण्यात आले आहे. आपल्या कुटुंबाचा संसाराचा गाडा ओढत त्यातून वेळ काढून गाव पातळीवर उल्लेखनीय कामगिरी या महिला पोलीस पाटील करत आहेत.या बाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे ....
आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महाराष्ट्र शासन महसूल विभाग पंधर वडा सांगता समारंभ तहसील कार्यालय दौंड या ठिकाणी ,माननीय श्री. उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला सर तहसीलदार सो.अरुण शेलार सर, यवत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी.नारायण देशमुख सर, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड अण्णासाहेब घोलप सर, निवासी नायब तहसीलदार बोरकर सर , तसेच नायब तहसीलदार नरुटे मॅडम यांच्या शुभहस्ते 2023-24 या महसूल वर्षामध्ये दौंड तालुक्यातील प्रशासनात उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल "उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार" महसूल पंधरवड्याचे औचित्य साधून आज अश्विनी दत्तात्रय सोनवणे यांना सन्मानपत्राद्वारे गौरवण्यात आले आहे.
तसेच भविष्यात अशाच चांगल्या प्रकारचे काम आपणाकडून व्हावे आणि अशीच प्रशासनाला आपणाकडून मोलाची मदत व्हावी अशी आशा व्यक्त केली आहे. तसेच श्री सुहास तुकाराम दिवेकर, योगेश राजाराम बोबडे , नीता दीपक वाघमारे यांनाही उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे भविष्यातील उत्कृष्ट कामगिरीची अशा व्यक्त केली आहे.
अशीच उल्लेखनीय कामगिरी आपणाकडून इथून पुढच्या काळात घडावी अशी आशा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.