आळंदी प्रतिनिधी
आळंदी येथील पोलीस मित्र युवा महासंघ महिला आघाडीच्या राज्य उपकार्याध्यक्षा पदी "सामाजिक कार्यकर्त्या नियती शिंदे" यांची निवड करण्यात आली असल्याचे अध्यक्ष प्रविण बोबडे यांनी सांगितले.
नियती ताई शिंदे ह्या गेली दहा वर्षांपासून अनाथांची माय बनून, वृद्धाश्रम चालवीत आहेत, अनेक वृद्ध महिला, पुरुष, आबाल वृद्ध यांना मायेचा आधार देत आहेत. या त्यांच्या कार्याची दखल घेत वरील नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात असे म्हटले आहे की,
आपले सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आरोग्य, क्रीडा क्षेत्रात संघर्षाची धडपड पाहून पोलीस प्रशासन व परिवार यांच्यावर विविध प्रकारे होत असलेले अन्याय तसेच सामान्य नागरिकांच्या न्यायहक्कासाठी सहकार्य करून न्याय मिळवून देण्यासाठी 1 ऑगस्ट 2024 ते 1 जुलै 2025 पर्यंत पोलीस मित्र युवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून महाराष्ट्र राज्य उपकार्याध्यक्षा महिला आघाडी पदी नियुक्ती करण्यात येत आहे. आपल्या पुढील काळात संविधानाचे व महासंघाचे निस्वार्थपणे समर्पित भावनेने वरिष्ठांच्या आदेशाचे व त्यांच्या शब्दांचे पालन करुन समितीच्या ध्येय धोरणात कोठेही बाधा येईल असे कृत्य करणार नाही हि अपेक्षा, असे मजकूर असलेल पत्र जाहीर करण्यात आले आहे.नियती ताई शिंदे यांच्या या सार्थ निवडीने त्यांच्यावर आळंदी व परिसरात अभिनंदनचा वर्षाव होत आहे.