निघोजे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी सोमनाथ बेंडाले उपाध्यक्ष पदी पुजा कान्हुरकर - राणी येळवंडे यांची निवड

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधि अर्जुन मेदनकर 
            येथील महानगाव निघोजे पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या सन २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षातील नवीन कार्यकारिणी सह पदाधिकारी यांची निवड जाहीर करण्यात आली. या समितीच्या अध्यक्ष पदी सोमनाथ बेंडाले, उपाध्यक्ष पदी पुजा कान्हुरकर, राणी येळवंडे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. 
             यावेळी निघोजे ग्रामपंचायत सरपंच सुनीता येळवंडे, उपसरपंच छाया येळवंडे, कैलास येळवंडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य या सर्वांचे सर्व संमतीने एकमताने पत्रकार सोमनाथ साहेबराव बेंडाले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली, यावेळी उपाध्यक्षपदी पुजा कान्हुरकर आणि राणी येळवंडे यांची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी सदाशिव आंद्रे, सतिश आंद्रे, प्रशांत येळवंडे, संदिप शिरोळे, तुकाराम येळवंडे, गुलाब कोळेकर, सोमनाथ येळवंडे , सुनिल येळवंडे, अमित येळवंडे, तानाजी येळवंडे, संतोष येळवंडे, शाळेचे मुख्याध्यापक कृष्णदेव काटकर, निलम गायकवाड, निलम साळुंखे, वनिता येळवंडे, शाळेतील शिक्षिका रोहिणी गव्हाणे, विद्यार्थी शिक्षक पालक यांच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी हार्दिक शुभेच्छा देवून अभिनंदन केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!